गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकामध्ये नवीन आक्रमक कीटक: चार ठिबक्यावाली फॉल आर्मीवर्म (स्पोडोपटेरा फ्रुगिपरडा)
लष्करी आळी (आर्मीवोर्म) सामान्यतः अमेरिका आणि इतर देशांमध्ये पाहिले जाते. अलीकडेच सर्वप्रथम ही आळी कर्नाटकमध्ये ऑगस्ट, 2018 ला आणि त्यानंतर इतर राज्यांतही आढळली आणि खास करून गुजरात राज्यात नुकसान करतांना आढळली आहे. सध्या, ही आळी फक्त मक्याच्या पिकावर नुकसान करतांना आढळली आहे परंतु भविष्यात ही आळी बाकीच्या पिकांच पण नुकसान करू शकते, म्हणून या आळीची ओळख आणि व्यवस्थापन हे महत्वाचे आहे हे जाणून घेणे. लष्करी आळीला ओळखणे खूपच सोपे आहे. लष्करी आळी ही तपकिरी रंगाची आहे, शरीराच्या प्रत्येक पृष्ठ भागावर केसांसोबतच मुरूमसारखे गडद ठिबके, आळीच्या शरीराच्या दुस-या ते शेवटच्या भागावर चौरस बनविणारे चार गडद ठिबके आहेत, शरीराच्या समोरच्या बाजूला उलट्या वाय आकाराचे फिक्कट रंगाचे डोके आहे आणि नर पतंगच्या पंखावर पांढरा ठीबका आहे, आळी अवस्था १२-२० दिवस आहे. या बहुपक्षीय कीटकांनी अंडी रेशीम धाग्याने झाकून असलेल्या पानांच्या पृष्ठभागावर त्यांचे अंडी घालतात. लहान आळी बाहेरील थर स्क्रॅप करतात आणि आतील क्लोरोफिल खातात. मोठ्या आळया पानांवर असमान छिद्र करून पान खातात आणि कोबमध्ये प्रवेश करतात आणि विकसित झालेली दाने खातात. पानांवर धुळी सारखे आळीची विष्टा दिसते. हि आळी मका पिकाचे ३४-५०% नुकसान करू शकते.
एकात्मिक व्यवस्थापनः १. पिक काढणीनंतर शेताची खोलवट नांगरणी करणे. २. पेरणीच्या वेळी जमिनीत निंबोळी पेंड 250 किलो / हेक्टर लागू करा. ३. शेतात एक प्रकाश सापळा स्थापित करा. ४. मका पिकानंतर पुन्हा मका पीक घेऊ नका. पिकाची फेरपालट करा. ५. हाताने अंड्यांचा समूह गोळा करून नष्ट करा. उपद्रव सुरू झाल्यानंतर, नीम आधारित औषधाची 10 लिटर पाण्यात @ 40 मिली (1500 पीपीएम) ते 10 मिली (10000 पीपीएम) फवारणी करावी. जास्त उपद्रव असेल तर, क्लोरोपायरिफॉस 20% EC 20 मिली किंवा स्पिनोसाड 45% एससी 3 मिली किंवा इमॅमेक्टिन बेंजोएट 5% एसजी @ 4 ग्रॅम किंवा क्लोरंट्रेनिलिप्रोल 18.5% एससी 3 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. पानावर योग्यरीत्या फवारणी झाली आहे का ते पाहावे. प्रत्येक फवारणीवेळी कीटकनाशक बदला. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
209
11
इतर लेख