AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील लष्करी आळी वर एकात्मिक व्यवस्थापन !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील लष्करी आळी वर एकात्मिक व्यवस्थापन !
🌱मका पिकात मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यापूर्वी आपल्याला अळीची ओळख आणि नुकसान याबद्दल माहीती असणे गरजेचे आहे. 🌱लष्करी अळीची ओळख: जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांमधून पूर्ण होतो.लष्करी अळीचा रंग हिरवा, गुलाबी, तपकिरी तसेच काळा असून डोक्याच्या पुढील बाजूस उलट इंग्रजी ‘ Y ’ आकाराची खूण तसेच शरीराच्या आठव्या ‘बॉडी सेगमेंट’ वर चौकोनी आकारात चार ठिपके. त्यात केस ही आढळतात. शरीरावर अन्यत्र अशी ठेवण नसते. 🌱नुकसान करण्याची क्षमता: एक मादी एकूण १५०० ते २००० अंडी घालू शकते. लष्करी अळी सुरुवातीच्या अवस्थेत आपली उपजीविका कोवळ्या पानांवर करतात. नंतर पोंग्यात छिद्र पडून आत शिरून आतील भागावर उपजीविका करतात.दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत अळी काहीवेळा पानांच्या कडापासून आतल्या भागापर्यंत खातात. नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने पीकवाढीचा भाग खातात, ज्यामुळे तुरा बाहेर येत नाही. कोवळी कणसे खातात. त्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाय वापरून आपणास अळीचे नियंत्रण करणे फायदेशीर राहते.लष्करी अळी मुळे पिकाच्या उत्पादनात साधारण ३० ते ६० टक्के पर्यंत घट होऊ शकते. 🌱लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना: प्रथम मका लागवड केल्यानंतर १५ दिवसांच्या आत नर पतंग पकडण्यासाठी फेरोमेन सापळे एकरी ४ ते ६ बसवावेत तसेच एकरी १० पक्षीथांबे लावावेत. 🌱जैविक नियंत्रण : १. अंड्यांवर उपजीविका करणाऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी ५०,००० अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीनवेळा शेतात सोडावीत. २. जैविक नियंत्रण पद्धत अवलंबायची असल्यास मित्र बुरशी मेटारायझम अनीसोपीली ५ ग्रॅम/लिटर अथवा मित्र जिवाणू बॅसिलस थूरिंजेनेसीस २ ग्रॅम/लिटर पाणी १० दिवसांच्या अंतराने दोनदा फवारावे. 🌱रासायनिक नियंत्रण : १. मका प्लॉट चे निरीक्षण करून जर एखाद्या ठिकाणी जर पाने कुरतडली असतील तर मका रोपांच्या पोंग्या मध्ये कार्बोफ्युरॉन दाणेदार कीटकनाशक चे दाणे टाकावे. २.अळीच्या वाढीच्या सुरुवातीची अवस्था असताना ॲझाडिरेक्टीन (१०००० पीपीएम) ४०० मि.लि. अधिक इमामेक्टिन बेन्झोएट १०० ग्रॅम प्रति एकर, थायमेथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ८० मि.लि. प्रति एकर किंवा स्पिनोटोराम (११.७ एससी) १०० मि.लि., क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ६० मि.लि. प्रति एकर, किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल + लॅमडा सायहॅलोथ्रीन घटक युक्त कीटकनाशक ८० मिली प्रति एकर याप्रमाणात फवारणी करावी. ३. फवारणी साठी शक्यतो सायंकाळची वेळ असावी तसेच फवारणी फक्त बाहेरून न करता फवारणी साठी सिंगल होल नोझल वापरून मका पिकाच्या पोंग्या मध्ये द्रावण जाईल याची विशेष काळजी घ्यावी तसेच फवारणी द्रावणात चांगल्या गुणवत्तेचे स्टीकिंग एजन्ट मिसळावे. वरील पद्धतीने नियोजन केल्यास आपणास अळी नियंत्रणास उत्तम मदत होईल. 🌱 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
3