AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
किडींचे जीवनचक्रजेनोमिक्स लॅब
मका पिकातील लष्करी अळीचे जीवन चक्र
मका पिकातील लष्करी अळी ही कीड मका, ऊस, ज्वारी, कपाशी व भाजीपाला या पिकांवर उपजीविका करते. अळी अवस्था ही पिकांसाठी नुकसानकारक आहे. 1) अंडी:- मादी पतंग मक्याच्या पोग्यात कोवळ्या पानांवर वरच्या बाजूने पुंजक्यात एका वेळी ५०-२०० अंडी घालते. 2) अळी:- अळीच्या अंगावरील गडद ठिपके स्पष्ट दिसून येतात. डोक्यावर पांढऱ्या रंगाचा उलटा इंग्रजी Y आकार स्पष्ट दिसतो. या अवस्थेत सुरूवातीला अळी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करते. ही अवस्था साधारणत: ३.५ ते ४ दिवसांची असते.
3) कोषावस्था:- कोषावस्थेत जाण्यासाठी अळी जमिनीत २-८ सेंटीमीटर खोलीपर्यंत आत शिरते आणि तेथेच कोषावस्थेत जाते. किडीचा पतंग हा करड्या रंगाचा असून हा नुकसान करत नाही. 4) पतंग:- किडीचा पतंग हा करड्या रंगाचा असतो. मादीचा जीवनकाळ सर्वसाधारणपणे १० दिवसांचा असतो. ही अवस्थादेखील नुकसान करत नाही. संदर्भ: जेनोमिक्स लॅब पिकांसंबंधी ही उपयुक्त्त माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेयर करा.
56
0