AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील लष्करी अळीची ओळख, नुकसान आणि नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील लष्करी अळीची ओळख, नुकसान आणि नियंत्रण
गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मका पिकात मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यापूर्वी आपल्याला अळीची ओळख आणि नुकसान याबद्दल माहीती असणे गरजेचे आहे. लष्करी अळीची ओळख: लष्करी अळीचा रंग हिरवा, गुलाबी, तपकिरी तसेच काळा असून अळीच्या दोनही डोळ्यांच्या मध्ये उलट दिशेने इंग्रजी वाय अक्षराची खूण असते सोबतच शरीरावर समलंब चौकोनी चार ठिपके असतात. नुकसान करण्याची क्षमता: अळीचे प्रौढ भुंगे एका रात्रीत 100 ते 200 किलोमीटर प्रवास करतात. प्रत्येक मादी 2000 पर्यंत अंडी घालते आणि एकाच हंगामात एक पेक्षा अधिक पिढ्या उदयास येतात. अळी तिच्या शेवटच्या अवस्थेत सर्वात जास्त खाते परंतु या अवस्थेत अळी नियंत्रण करणे अवघड जाते. लष्करी अळी पिकाच्या कोणत्याही टप्प्यात पिकाच्या सर्व भागांवर हल्ला करते. पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत ती कोंबाचे नुकसान करते. अळ्या पाने खातात, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. लष्करी अळी मुळे पिकाच्या उत्पादनात जवळजवळ 60 % पर्यंत नुकसान होऊ शकते. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना: ➡️ लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सिंट्रानिलीप्रोल+ थायोमेथोक्झाम घटक असणारे फोर्टेंझा ड्युओ हे कीटकनाशक 6 मिली प्रति किलो बियाणे प्रक्रियेसाठी वापरावे. ➡️ सोबतच मका लागवड केल्यानंतर 15 दिवसांच्या आत नर पतंग पकडण्यासाठी फेरोमेन सापळे एकरी 4 ते 6 बसवावेत. ➡️ मकेचा प्लॉट चे रोज निरीक्षण करून जर एखाद्या ठिकाणी जर पाने कुरतडली असतील तर मका रोपांच्या पोंग्या मध्ये कार्बोफ्युरॉन दाणेदार कीटकनाशकाचे दाणे टाकावेत. ➡️ प्रादुर्भाव चा विचार करून पुढेही आपण काही फवारण्या खालीलप्रमाणे करू शकतो जसे कि इमामेक्टिन बेन्झोएट घटक असणारे पॉवर ग्रो अमेझ एक्स 100 ग्रॅम एकरी सोबत 10000 पी पी एम चे निंबोळी अर्क 300 मिली प्रती एकर एकत्र फवारणी किंवा क्लोरँट्रीलीप्रोल+लॅम्बडा सायह्यॅलोथ्रीन घटक युक्त कीटकनाशक अँप्लिगो 80 मिली किंवा स्पिनाटोराम घटक असणारे डेलीगेट 180 मिली/एकर यांसारख्या रसायनांची फवारणी करावी. ➡️ फवारणी साठी शक्यतो सायंकाळची वेळ असावी तसेच फवारणी द्रावणात चांगल्या गुणवत्तेचे स्टीकिंग एजन्ट मिसळावे. फवारणी फक्त बाहेरून न करता मकेच्या पोंग्या मध्ये द्रावण जाईल याची विशेष काळजी घ्यावी. ➡️ जैविक नियंत्रण पद्धत अवलंबायची असल्यास मित्र बुरशी मेटारायझम अनीसोपीली 5 ग्रॅम/लिटर अथवा मित्र जिवाणू बॅसिलस थूरिंजेनेसीस 400 ग्रॅम/एकर 10 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारावे. वरील पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच अळी नियंत्रणस मदत होईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
3