गुरु ज्ञानAgrostar
मका पिकातील खत व्यवस्थापन!
🌱तृणधान्यांच्या तुलनेत मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाण अन्नद्रव्ये शोषून घेते. त्यामुळे जास्त उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
🌱 मका पिकाला सुरवातीपासून ते दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. परंतु अतिरिक्त पाण्यामुळे किंवा इतर कारणांमुळे नत्राचा निचरा होतो म्हणून नत्रयुक्त खतमात्रा विभागून द्यावी लागते. परंतु स्फुरद आणि पालाश युक्त खते पेरणीच्या वेळी संपूर्ण मात्रा द्यावी.
🌱यामध्ये सुरुवातीला मुख्य अन्नद्रव्यांच्या पुरवठयासाठी सुपर फॉस्फेट, डीएपी, 10:26:26, म्युरेट ऑफ पोटॅश यांसारख्या खतांचा वापर करावा. तसेच उभ्या पिकात खत देताना युरिया, 19:19:19, 24:24:00, 20:20:0:13 यांसारख्या रासायनिक खतांचा वापर करावा.
🌱तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक आणि बोरॉन ची कमतरता दिसून येते यासाठी पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा पीक वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत झिंक घटक असेलेले ॲग्रोस्टारचे झिंक्स व बोरॉन आणि ॲग्रोस्टार न्यूट्री प्रो बोरॉन ची फवारणी करावी. जेणेकरून मका कणीसातील दाणे पूर्णपणे भरतील.
🌱मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे.
🌱संदर्भ: Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.