गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
मका पिकातील खत व्यवस्थापन!
➡️ मका पिकाला सुरवातीपासून ते दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. परंतु अतिरिक्त पाण्यामुळे किंवा इतर कारणांमुळे नत्राचा निचरा होतो म्हणून नत्रयुक्त खतमात्रा विभागून द्यावी लागते. परंतु स्फुरद आणि पालाश युक्त खते पेरणीच्या वेळी संपूर्ण मात्रा द्यावी. ➡️ यामध्ये सुरुवातीला मुख्य अन्नद्रव्यांच्या पुरवठयासाठी सुपर फॉस्फेट, डीएपी, 10:26:26, म्युरेट ऑफ पोटॅश यांसारख्या खतांचा वापर करावा. तसेच उभ्या पिकात खत देताना युरिया, 19:19:19, 24:24:00, 20:20:0:13 यांसारख्या रासायनिक खतांचा वापर करावा. ➡️ तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक आणि बोरॉन ची कमतरता दिसून येते यासाठी पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा पीक वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत चिलेटेड झिंक आणि बोरॉन ची वेगवेगळ्या वेळी फवारणी करावी. जेणेकरून मका कणीसातील दाणे पूर्णपणे भरतील. ➡️ मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे. ➡️ खरीप हंगामात सगळीकडे एकसारखा पाऊस होत नसल्याने बहुतेक शेतकरी जिरायती मकाची पेरणी करतात. त्यामुळे पिकास योग्य कालावधीत पाणीपुरवठा होत नाही. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
3
इतर लेख