AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मंगळवार चा हवामान अंदाज!
अॅग्रोस्टार रेडियोAgrostar
मंगळवार चा हवामान अंदाज!
"👉🏻आजची मंगळवार ची खास प्रस्तुती. हवामान अंदाज मध्ये आपले स्वागत आहे. 👉🏻आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज. महाराष्ट्रामध्ये सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अश्यातच गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात काढणीला आल्येला पिकाचे नुकसान झाले आहे. 👉🏻जर आपण कालचा विचार केला तर काल नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. तर येत्या दिवसात पश्चिम महाराष्ट्रात तसेच विदर्भ आणि मराठवाडा या चारही विभागां मध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 👉🏻महाराष्ट्रामधील सिंधदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच १० ते २० मिली मीटर पावसाची शक्यता असेल. त्यानंतर कोल्हापूर. सातारा. सांगली. पुणे. रत्नागिरी. सह सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा म्हणजेच ४ ते १० मिली मीटर पाऊस होऊ शकतो. 👉🏻तर या सर्व बाबी लक्ष्यात घेऊन आपण आपल्या पिकाचे पूर्व नियोजन करावे. तसेच योग्य ती खबरदारी बाळगावी. आणि हवामान संबंधी ताज्या बातम्या साठी अ‍ॅग्रोस्टार सोबत जोडलेले राहा. आजची खास माहिती येथे समाप्त होत आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान मधील अन्य लेख ऐका. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
16
0
इतर लेख