AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकातील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!
 हि कीड वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता आणि जास्त उष्णतामान या किडीस पोषक असते. उन्हाळ्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. सुरुवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यामधून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याला पोखरते आणि आत भुयार तयार करते. प्रादुर्भावग्रस्त शेंडा मलूल होतो आणि नंतर वाळतो. झाडाला कळ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर हीच अळी पुढे कळ्या, फुले आणि फळे यांमध्ये शिरून त्यांतील पेशी खाते. अळ्या एका कळीवरून दुसर्‍या कळीवर आणि एका फळावरून दुसर्‍या फळावर जातात आणि त्यांचे नुकसान करतात. एक अळी अनेक कळ्या, फुले तसेच फळांचे नुकसान करू शकते. पोखरलेल्या कळ्या आणि फुले वाळतात आणि खाली पडतात. प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात.  नियंत्रण:- • या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रथम किडलेल्या कळ्या, फुले आणि फळे गोळा करून जाळून टाकावीत. • या किडीची कोषावस्था पालापाचोळ्यामध्ये असल्यामुळे तो गोळा करून जाळून टाकावा. • त्याचबरोबर ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. • किडीची अंडी दिसून येताच ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाचे ५-६ ट्रायकोकार्ड (१ लाख /हे.) ८-१० दिवसांच्या अंतराने लावावेत. • प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी @३ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५% डब्ल्यूजी @५ ग्रॅम किंवा डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफॉस ३५% ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • प्रत्येक फवारणीसाठी कीटकनाशक आलटून-पालटून वापरावे. तसेच पिकाचा फेरपालट करावा. • रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यावर ५ ते ७ दिवस भेंडीची काढणी करू नये.
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस., ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
20
9
इतर लेख