AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील मावा कीड नियंत्रण
गुरु ज्ञानAgrostar
भेंडी पिकातील मावा कीड नियंत्रण
🌱सध्या बरेच शेतकरी भेंडी पिकाची लागवड करताना दिसून येत आहेत, पण लागवड केल्यावर वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांच्या शेतात कीड रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो आज आपण याबद्द्ल सविस्तर माहिती पाहू.👇 मावा कीड पानांमधील तसेच कोवळ्या फुटव्यामधील रस शोषण करते त्यामुळे पाने गोळा होऊन झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच किडीच्या शरीरातून मधाळ चिकट पदार्थ बाहेर पडत असल्यामुळे बुरशीची लागण तसेच मुंग्यांचा प्रादुर्भाव देखील पिकात आढळून येतो. यावर उपाय योजना म्हणून पिवळया चिकट सापळ्यांचा वापर करावा तसेच सुरुवातीच्या अवस्थेत Imidacloprid 70.00% WG घटक असणारे मेंटो कीटकनाशक @0.4 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
6
इतर लेख