AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी नियोजन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी नियोजन!
➡️ भेंडी पिकामध्ये गुणवत्तापूर्ण भेंडी उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक (कीड व रोग नियंत्रण) संरक्षण प्रतिबंधात्मक पद्धतीने करणे गरजेचे आहे. ➡️ तसेच पिकाची अवस्था व आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. जसेच्या पिकामध्ये फळधारणा सुरु होताच १३:४०:१३ @२ किलो व १३:००:४५ @२ किलो वेगवेगळ्या वेळी ४ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे किंवा ठिबक सुविधा उपलब्ध नसल्यास दोन्ही विद्रव्ये खते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ➡️ तसेच भेंडीची गुणवत्ता सुधारण्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप प्रमाणात फवारणी करावी. ➡️ टीप - लुसलुशीत व कोवळ्या भेंडीला मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी एक दिवसाआड भेंडीची तोडणी करावी. उशीर झाल्यास भेंडीतील बिया मोठ्या होऊन भेंडी कडक बनते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
54
14
इतर लेख