AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुरी रोगाचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
भुरी रोगाचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण!
✅थंड आणि कोरडे वातावरण हे भुरी रोगाच्या वाढीसाठी पोषक आहे. ⮚ भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जुन्या किंवा बुंध्याजवळील पानांवर होतो ⮚ भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या पानांवर, फुलकळी तसेच देठावर भुरकट रंगाचे बुरशीचे ठिपके दिसून येतात. कालांतराने झाडाची पाने पिवळी पडून गळून जातात. तसेच प्रकाशसंश्लेषन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. ⮚ भुरी रोगाचा प्रादुर्भाव मिरची,टोमॅटो,भेंडी, वेलवर्गीय पीकात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. ✅पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. 1. लागवडीसाठी भुरी रोगास सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करावी. 2. पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करावे तसेच पिकांची फेरपालट करावी. 3. पिकास पोटॅश अन्नद्रव्य कमी पडल्यास पीक भुरी रोगाला बळी पडते त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित प्रमाणात करून पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही. 4. प्लॉट मध्ये आद्रता टिकवून ठेवण्यासाठी शक्य असल्यास तुषार सिंचनाचा वापर करावा. 5. कीड आणि रोगांच्या विरोधी लढण्याची क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन @ 1 मिली प्रति लिटर तसेच कायटोसन घटक असणारे कीटोगार्ड 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेपूर्वी 2 वेळा फवारणी करावी 6. शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा. यामध्ये एज़ोक्सीस्ट्रोबिन 23% एससी घटक असेलेले अजॅक्स बुरशीनाशक @ २०० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल. ✅संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1
इतर लेख