AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पेरणी विषयक माहिती
गुरु ज्ञानAgrostar
भुईमूग पेरणी विषयक माहिती
🌱भुईमूग हे पीक खरीप व उन्हाळी हंगामात घेतले जाते. पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान सरासरी तापमान 16 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असावे. त्यामुळे भुईमूगाची उगवण चांगली होण्यास मदत होते. 🌱खरीप भुईमूग पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. 15 जून ते 15 जूलै अखेरपर्यंत भुईमूग पिकाची पेरणी करावी. 🌱उशिरा पेरणी केल्यास त्याचा भुईमूगाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पन्नावर परिणाम होतो. पेरणीसाठी एकरी 20 ते 40 किलो बियाणे वापरावे. 🌱चांगली उगवण होण्यासाठी मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्लू पी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाणास बीजप्रक्रिया करावी. 🌱पेरणीसाठी पाभरीचा वापर करावा किंवा सुधारित टोकण पद्धतीने लागवड करावी. पसऱ्या व निमपसऱ्या वाणांसाठी 40 x 40 सें. मी. तर उपट्या वाणासाठी 30 x 15 सें. मी. अंतर ठेवावे. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
4