गुरु ज्ञानAgrostar
भुईमूग पिकामध्ये जिप्सम का वापरावे?
🌱भुईमूग पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे.
🌱जिप्सममध्ये कॅल्शिअम (24%) व गंधक (18.6%) हे मुख्य घटक आहेत. हे दोन्ही घटक आऱ्याच्या वाढीसाठी आणि शेंगा पोसण्यासाठी उपयुक्त ठरतात.
🌱कॅल्शिअममुळे भुईमुगाच्या शेंगांची टरफले मजबूत बनतात तसेच शेंगांमध्ये दाणे चांगले भरतात.
🌱शेंगदाण्यातील तेल तयार होण्याच्या प्रक्रियेत गंधकाची गरज अधिक असते तसेच गंधकामुळे भुईमुगाच्या मुळावरील गाठींचे प्रमाण वाढते, पानांचा आकार वाढून प्रत सुधारते, रोगांचे प्रमाण कमी होते. भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन वाढते.
🌱जिप्समच्या वापरामुळे शेंगा चांगल्या पोसून, उत्पादन वाढण्यास मदत होते. जिप्सम 150 ते200 किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.