AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकामध्ये जिप्समचा वापर
गुरु ज्ञानAgrostar
भुईमूग पिकामध्ये जिप्समचा वापर
🌱भुईमूग हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. या पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. जिप्सममध्ये कॅल्शिअम (24%) व गंधक (18.6%) हे मुख्य घटक आहेत. हे दोन्ही घटक आऱ्याच्या वाढीसाठी आणि शेंगा पोसण्यासाठी उपयुक्त ठरतात. कॅल्शिअममुळे भुईमुगाच्या शेंगांची टरफले मजबूत बनतात तसेच शेंगांमध्ये दाणे चांगले भरतात. शेंगदाण्यातील तेल तयार होण्याच्या प्रक्रियेत गंधकाची गरज अधिक असते तसेच गंधकामुळे भुईमुगाच्या मुळावरील गाठींचे प्रमाण वाढते, पानांचा आकार वाढून प्रत सुधारते, रोगांचे प्रमाण कमी होते तसेच भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन वाढते. ⮚ कॅल्शियम आणि गंधक (सल्फर) या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यावर पिकांवर खालीलप्रमाणे परिणाम दिसून येतात. ● कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे कधीकधी शेंगा पोचट भरून त्याच्यावर सुरकुतल्या सारख्या रेषा उमटतात. मुळावर गाठी कमी लागतात. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते ● गंधकाच्या कमतरतेमुळे नवीन पानाचा रंग फिक्कट हिरवा दिसतो. कोवळी आणि मधली पाने पिवळी पडू लागतात.अतिशय कमतरता असल्यास पाने कागदासारखी पातळ होतात. ⮚ जिप्समच्या वापराचे फायदे- ● जमिनीची सुपीकता वाढून ती भुसभुशीत होते. ● क्षारपड जमीन जिप्समच्या वापरामुळे सुधारते. ● बियाण्याची उगवण क्षमता जिप्सममुळे वाढते. ● जिप्सममुळे पाण्यातील क्षारांचा निचरा होण्यास मदत होते. ● सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. ● पिकाची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता वाढते. ● फळांची, पिकांची गुणवत्ता सुधारते. ⮚ वापर - जिप्समचा वापर करण्यापूर्वी माती परीक्षण करून जमिनीचा सामू किती आहे त्यानुसार जिप्सम ची मात्रा ठरवावी. साधारणपणे 8 पेक्षा जास्त सामू असेलेल्या जमिनीमध्ये इतर खतांसोबत एकरी 300 ते 500 किलो जिप्सम चा वापर करावा. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
3