AgroStar
भुईमूग पिकामधील हुमणी किडीचे नियंत्रण!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकामधील हुमणी किडीचे नियंत्रण!
• हलकी, चिकण किंवा वालुकामय जमिनीमध्ये या किडीचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो. • हि अळी पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांवर उपजीविका करते त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त रोपे हळूहळू सुकतात. • हि अळी पिकाच्या ओळींमध्ये रोपांचे नुकसान करत पुढे सरकते. • या किडीमुळे पिकाचे सरासरी ७०-८० टक्के नुकसान होते. नियंत्रण:- • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल वर नांगरट करून जमीन उन्हात तापल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. • शेताच्या सभोवतालच्या झाडांवर क्विनॉलफॉस २५ ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • पहिल्या चांगल्या पावसानंतर, या किडीचे प्रौढ जमिनीतून बाहेर येतात आणि बाभूळ, बोर, कडुनिंब या झाडांवर उपजीविका करतात. • फेरोमोन (अनीसोल), मेथॉक्सी बेंझिन सापळे स्थापित करा. त्यातील ४-५ थेंब स्पंजच्या तुकड्यांवर टाकून सापळे हे झाडावर लटकवा. यामुळे प्रौढ किडी आकर्षित होतात. • तसेच प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. याद्वारे आकर्षित झालेले भुंगेरे गोळा करून नष्ट करावे. • क्लोरपायरीफॉस २०% ईसी @२० मिली प्रति किलो बियाणास बीजप्रक्रिया करावी. यामुळे किडीचा प्रादुर्भाव नियंत्रित होण्यास मदत होते. • उभे पिकामध्ये, क्लोरपायरीफॉस @ २० ईसी @ ४ लिटर प्रती हेक्टर सिंचनाद्वारे द्यावे. • जैविक कीड नियंत्रक ज्यामध्ये बिव्हेरिया बॅसियना, मॅटेरायझियम अ‍ॅनीसोपली, व्हर्टीसिलीयम लेकॅनी याचा समावेश आहे. त्याचा कंपोस्ट खतात मिसळुन, ड्रिपद्वारे अथवा ड्रेचिंगद्वारे (पिकाच्या मुळाशी आळवणी करून) एकरी दोन लिटर/दोन किलो या प्रमाणात वापर करावा. • क्लोरपायरीफॉस २० ईसी @ ४ लिटर प्रति ५ लिटर पाण्यामध्ये मिसळून १०० किलो वाळूत मिसळावे व सावलीत सुकवून शेतात टाकावे. टाकल्यानंतर पाऊस पडत नसेल तर हलके पाणी द्यावे.
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
82
15
इतर लेख