गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकातील पिवळेपणा समस्या!
🌱भुईमूग पिकाची तेलवर्गीय पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उन्हाळी आणि खरिफ हंगामात पेरणी केली जाते. त्यामुळे दाण्यांमधील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी गंधक हे अन्नद्रव्य महत्वाचे आहे. भुईमूग पिकास गंधक अथवा लौह कमी पडल्यास पिकास भुरकट पिवळेपणा दिसून येतो. त्यामुळे भुईमूग पेरणी करताना पहिल्या खतांच्या मात्रासोबत सलफर (९०%) @ ३ किलो प्रति एकर जमिनीतून देणे आवश्यक असून पीक वाढीच्या अवस्थेत चिलेटेड फेरस १२% @ ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी. तसेच कीड व रोग नियंत्रित ठेऊन पिकात वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. जेणेकरून भुईमूग पिकात पिवळेपणाची समस्या येणार नाही.
🌱संदर्भ:- AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.