AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकातील पिवळेपणा करा दूर!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भुईमूग पिकातील पिवळेपणा करा दूर!
➡️ सध्या उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. भुईमूग पिकास वाढीच्या अवस्थेत गंधक अथवा लोह कमी पडल्यास पिकास भुरकट पिवळेपणा दिसून येतो. ➡️ त्यामुळे भुईमूग पेरणी करताना पहिल्या खतांच्या मात्रासोबत गंधक ९०% @३ किलो प्रति एकर जमिनीतून देणे आवश्यक असून पीक वाढीच्या अवस्थेत चिलेटेड फेरस १२% @०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी. ➡️ किंवा १९:१९:१९ @३ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ➡️ तसेच कीड व रोग नियंत्रित ठेऊन पिकात वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. जेणेकरून भुईमूग पिकात पिवळेपणाची समस्या येणार नाही. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
10
इतर लेख