AgroStar
भुईमूग पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भुईमूग पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी
भुईमूग पिकाची तेलवर्गीय पीक म्ह्णून मोठ्या प्रमाणात उन्हाळी आणि खरिफ हंगामात पेरणी केली जाते. त्यामुळे दाण्यांमधील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी गंधक हे अन्नद्रव्य महत्वाचे आहे. भुईमूग पिकास गंधक अथवा लोह कमी पडल्यास पिकास भुरकट पिवळेपणा दिसून येतो. त्यामुळे भुईमूग पेरणी करताना पहिल्या खतांच्या मात्रासोबत अथवा पीक वाढीच्या अवस्थेत पाण्याची उपलब्धता असल्यास पावर ग्रो सल्फर 90 % @ 3 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. तसेच पीक वाढीच्या अवस्थेत चिलेटेड फेरस 12 % @ 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच कीड व रोग नियंत्रित ठेऊन पिकात वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. जेणेकरून भुईमूग पिकात पिवळेपणाची समस्या येणार नाही तसेच दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण वाढून उत्पादनात भर पडेल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
9
2
इतर लेख