AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकातील पाने पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भुईमूग पिकातील पाने पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!
• भुईमूग पिकावर ही किड अति महत्वाची व नुकसानकारक अशी आढळून आली आहे. विशेषतः उन्हाळी हंगामात जिथे भूईमूग घेतला जातो त्या ठिकाणी या किडीमुळे खूप नुकसान होते. • अळी आकाराने लहान म्हणजे ५ मि.मि. लांबीची असून पाठीमागचे बाजूस निमुळती होत जाते व रंगाने तपकिरी किंवा फिकट हिरवी असते. डोके व छातीचा भाग गर्द असतो. • प्रथम ही अळी पानाच्या वरील पातळ आवरण छेदून आत शिरते आणि पानातील भाग पोखरत जाते त्यामुळे या अवस्थेत तिला पाने पोखरणारी अळी असे म्हणतात. • अळीने पानातील हिरवा हरित भाग खाल्ल्रामुळे पानावर पारदर्शक आवरण फक्त दिसते. • परंतु अळी जसजशी मोठी होते तसतशी ती पोखरलेल्या भागातून बाहेर येते व शेजारील पाने एकत्र करून तोंडातील लाळेच्या सहायाने चिटकवते व अशा गुंडाळलेल्या पानामध्ये राहून पानांचा हिरवा भाग खाते म्हणून या अवस्थेत तिला पाने गुंडाळणारी अळी असे संबोधतात. • अशी गुंडाळलेली पाने वाळून जमिनीवर खाली पडतात व पिकाचे अतोनात नुकसान होते. नियंत्रण- ➡️ शेतात रात्रीचेवेळी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. ➡️ उन्हाळी भुईमूगानंतर सोयाबीन करणे टाळावे तसेच सोयाबीन नंतर भुईमूग करणे टाळा. ➡️ या अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसताच थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @८० मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
11
इतर लेख