AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकातील तण नियंत्रण
गुरु ज्ञानAgrostar
भुईमूग पिकातील तण नियंत्रण
👉तण हे पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, जागा आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करते, ज्यामुळे पिकाची वाढ प्रभावित होते. तसेच, तणांमुळे शेतात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, ज्याचा थेट परिणाम पिकाच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होतो. यामुळे भुईमूग पिकामध्ये तण नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. 👉भुईमूग पिकात तणांचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी इमॅझाथापायर 10% एस.एल घटक असणारे पॅराशूट तणनाशक @400 मिली प्रति एकर आणि क्विझालोफोप इथाइल 5% ईसी घटक असणारे क्विझ मास्टर तणनाशक @300 मिली प्रति एकर एकत्र करून फवारणी करावी. यामुळे पिकातील लांब आणि गोल दोन्ही प्रकारच्या तणांचे नियंत्रण होण्यास मदत मिळते. 👉फवारणीसाठी प्रति एकर 150 लिटर पाणी वापरावे आणि फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. योग्य वेळी तणनाशकांचा वापर केल्यास भुईमूग पिकाची निरोगी वाढ होऊन अधिक उत्पादन मिळवता येते. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0
इतर लेख