AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकांमधील अळीचे नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
भुईमूग पिकांमधील अळीचे नियंत्रण!
🌱उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.  प्रथम ही अळी पानाच्या वरील पातळ आवरण छेदून आत शिरते आणि पानातील भाग पोखरत जाते. अळीने पानातील हिरवा हरित भाग खाल्ल्रामुळे पानावर पारदर्शक आवरण फक्त दिसते. परंतु अळी जसजशी मोठी होते तसतशी ती पोखरलेल्या भागातून बाहेर येते व शेजारील पाने एकत्र करून तोंडातील लाळेच्या सहायाने चिटकवते व अशा गुंडाळलेल्या पानामध्ये राहून पानांचा हिरवा भाग खाते म्हणून या अवस्थेत तिला पाने गुंडाळणारी अळी असे संबोधतात. 🌱अशी गुंडाळलेली पाने वाळून जमिनीवर खाली पडतात व पिकाचे अतोनात नुकसान होते.या अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसताच थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी घटक असलेले किल एक्स औषधाची @८० मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0
इतर लेख