AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हायरल जुगाडलोकमत
भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड!
➡️गरज ही शोधाची जननी आहे, हे वाक्य किंवा सुविचार आपण शाळेत असतानाच वाचला आहे. गरजवंत माणूस डोकं लावून जुगाड बवनून आपली वेळ साधत असतो. ग्रामीण भागात असे जुगाड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामध्ये, इंजिनिअरींगचं कुठलंही शिक्षण न घेतलेला शेतकरी आघाडीवर असतो. शेती आणि शेतीसंदर्भातील कामासाठी असंच मोडून-तोडून बनवलेल्या साहित्यांचा जुगाड तो बनवत असतो. असाच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी या शेतकऱ्याने भन्नाट आयडिया लावली आहे. ➡️शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. जुगाडू लाईफ हॅक्स या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, महिला आणि पुरुष शेतकरी शेतात काम करताना दिसत आहेत. त्यांजवळ एक स्पेंडर दुचाकी दिसून येत असून या दुचाकीच्या चाकाचा वापर करुन ते शेंगा झाडापासून वेगळ्या करत आहेत. मानवी हातापेक्षा गाडीच्या स्पीडमुळे या शेंगा लवकर वेगळ्या होताना दिसून येते. ➡️सोशल मीडियावर नेटीझन्सला शेतकऱ्याचा हा जुगाड चांगलाच पसंत पडला आहे. इंजिनिअरची पदवी घेतेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही एखाद्या शेतकऱ्याचं डोकं फास्ट चालत असतं, हेच या व्हिडिओतून दिसून येतं. शेतकऱ्यांची ही भन्नाट आयडिया सोशल मीडियावर व्हयरल होत आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
5
इतर लेख