AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाव नव्हता म्हणून पठ्ठ्यांनी परदेशात विकला कांदा !
कृषी वार्ताAgrostar
भाव नव्हता म्हणून पठ्ठ्यांनी परदेशात विकला कांदा !
🧅शेतकरी कांदा घेऊन बाजारपेठेत दाखल झाले असता व्यापारी पाठ फिरवतात . असाच काहीसा प्रकार घडला आहे मनमाड येथे. कांदा दराबाबत दुःखी असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कांद्याला मार्केट मिळवून देण्याचा निश्चय केला. मनमाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा पण गोल्टीच्या कांद्याची थेट व्हिएतनामलाच निर्यात केली. शेतकऱ्यांचा हा प्रयोग फसेल असं कित्येकांना वाटू लागले. यासाठी त्यांना सर्वांनी हिणवले देखील. 🧅मात्र शेतकऱ्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे त्याच मार्केटमध्ये कांद्याला 20 किलो असा दर मिळाला आहे शिवाय कोणाच्याही मध्यस्तीविना.मार्केट शेतकऱ्यांच्या हातात गेले तर काय होऊ शकत याच हे उत्तम उदाहरण आहे. शेतात अमाप कष्ट घेऊनही पिकाला कवडीमोल दर मिळाला नाही. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. 🧅कितीतरी शेतकऱ्यांनी कांद्याचे फुकट वाटप केले, तर काहींनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले. मनमाडमध्येही कांद्याला भाव नव्हता. व्यापाऱ्यांनी गोल्टी कांद्याकडे पाठच फिरविली होती. तरुण व्यापारी फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून आपल्या योजनेची माहिती देत त्यांच्याकडील कांदा गोळा केला. 🧅नंतर दोन कंटेनर भरून व्हिएतनामला कांदा रवाना केला. व्हिएतनामसह इतर देशांतदेखील कांद्याला चांगला भाव मिळाला असल्याने अजून 8 ते 10 कंटेनर पाठविण्यात येणार असल्याचे तरुण व्यापारी फजल कच्छी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कांद्याला व्हिएतनामध्ये 20 रुपये असा भाव आहे. बघायला गेलं तर शेतकऱ्याला सर्व खर्च वजा करता 6 ते 8 रुपये किलोमागे पदरात पडत आहेत. 🧅संदर्भ:-AgroStar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
3
इतर लेख