AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भालाफेकपटू नीरज चोप्राने पटकावलं गोल्ड मेडल!
समाचारNews 18 lokmat
भालाफेकपटू नीरज चोप्राने पटकावलं गोल्ड मेडल!
भारतासाठी मोठी आनंदाची बातमी! तब्बल 14 वर्षानंतर भारत गोल्ड मेडल मिळविण्यात यशस्वी झाला आहे. अॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील 125 वर्षांचा भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढया लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धकांनी सुवर्ण पदकाची अपेक्षाच सोडली. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला. त्याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर लांब भालाफेक फेकला. त्याच्या या प्रयत्नाने भारताचा अॅथलेटिक्समधील इतिहास बदलला. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
1
इतर लेख