AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतीय सैन्यात भरती होणाऱ्यांसाठी बातमी!
नोकरीAgrostar
भारतीय सैन्यात भरती होणाऱ्यांसाठी बातमी!
✅भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. वर्षातून निघालेल्या प्रत्येक सैन्य भरतीमध्ये तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर आता तसं होणार नाहीये. कारण आर्मी भरतीसाठी तुम्ही वर्षातून एकदाच अर्ज करू शकाल. ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी ही माहिती दिली आहे. ✅राजस्थानचे उपमहासंचालक (भरती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी सांगितले की, ‘या वर्षापासून उमेदवार वर्षातून एकदाच सैन्य भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकतील. जर तुम्हाला सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CEE सह रॅलीद्वारे सैन्यात नोकरी मिळवायची असेल, तर तुम्ही वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरू शकत नाही. ✅सध्या अ‍ॅग्निव्हर (जनरल ड्यूटी), तांत्रिक, लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडमेन, अ‍ॅग्निव्हर (जनरल ड्यूटी) महिला सैन्य पोलिस, सैनिक टेक्निकल एनए/एनए व्हेट आणि सेपॉय फार्मा, धार्मिक शिक्षक, एचएव्ही सर्व्हेअर ऑटो कार्टोग्राफी इत्यादी पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे. ✅16 फेब्रुवारीपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. . तुम्ही indianarmy.nic.in वर जाऊन 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता. ✅संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
8
इतर लेख