AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतीय रेल्वेमध्ये 10 उत्तीर्णांना नोकरीची संधी !
नोकरीAgrostar
भारतीय रेल्वेमध्ये 10 उत्तीर्णांना नोकरीची संधी !
➡️कोरोणा कालावधी मधून सगळे व्यवस्था सावरत असताना खाजगी आणि सरकारी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या विविध संधीउपलब्ध होत आहेत.कारण कोरोना मध्ये बर्‍याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. असंख्य लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. ➡️परंतु आता नोकरीच्या संधी चालून येत असल्याने या संधीचे सोने करणे खूप महत्वाचेआहे. आता नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना भारतीय रेल्वेच्या माध्यमातून एक चांगली बातमी समोर येत आहे.ती म्हणजे भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अप्रेंटिस पदासाठी ही भरतीप्रक्रिया राबविली जाणारआहे. या लेखामध्ये आपण या भरती विषयी माहिती घेऊ. ➡️दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये भरती : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे तब्बल 1044 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामध्ये नोकरीच्या ठिकाणी नागपूर असणार आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 24 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. या भरती विषयी अधिक माहिती साठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला इच्छुकांनी भेट द्यावी. ➡️या पदांसाठी होत आहे भरती : फिटर,वेल्डर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, प्लंबर, पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, डिझेल मेकॅनिक, ट्रिमर, ड्रायव्हर कम मेकॅनिक, मेकॅनिस्ट, डिजिटल फोटो ग्राफर, टर्नर, डेंटल लॅब टेक्निशिअन,हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर,गॅस कटर,केबल जॉइंटर, मेसन पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. ➡️रिक्त पदे : जवळजवळ तब्बल 1044 पदांसाठी( अप्रेंटिस) ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.यामध्ये नागपूर विभागासाठी 980 पदे भरली जाणार असूनमोतीबाग वर्कशॉप साठी64 पदे भरली जाणार आहेत. ➡️या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य (10+2 परीक्षा प्रणालीअंतर्गत) 50 टक्के गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
9