AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतीय पोस्ट विभागाकडून तब्बल 1 लाख जागांसाठी भरती !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
भारतीय पोस्ट विभागाकडून तब्बल 1 लाख जागांसाठी भरती !
➡️अनेक तरुण विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करतात. बऱ्याच दिवसापासून राज्यात आणि देशात भरतीच्या प्रक्रिया बंद असल्यामुळे अनेक तरुण चातकासारखे भरतीची वाट पाहत होते. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून भारतीय पोस्ट विभागाकडून जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. संपूर्ण देशातील 23 मंडळांमध्ये ही भरती केली जाणार असून याचा फायदा जवळजवळ एक लाख बेरोजगार तरुणांना मिळू शकणार आहे. ➡️भारतातील एकूण पदनिहाय जागा : 1- पोस्टमन- 59 हजार 99 जागा 2- मेल गार्ड- एकूण 1445 जागा 3- मल्टिटास्किंग पोस्ट- एकूण 37 हजार 539 जागा ➡️महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागा : 1- पोस्टमन- नऊ हजार 884 जागा 2- मेल गार्ड- 147 जागा 3- मल्टिटास्किंग पोस्ट- पाच हजार 478 जागा ➡️या भरतीसाठी आवश्यक पात्रता : उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असेल ते उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. यामधील काही पदांसाठी उमेदवारांनी इयत्ता बारावी पूर्ण केलेली असावी तसेच मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. ➡️या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा : टपाल विभागाच्या निकषानुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे कमीत कमी वय 18 ते जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. ➡️अर्ज करण्यासाठीची वेबसाईट : indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वरील मुख्य पृष्ठावरील भरती या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
20
इतर लेख