AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतीय अन्नधान्य कृषी निधी सुरू, पीक साठवणुकीची सुविधा
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
भारतीय अन्नधान्य कृषी निधी सुरू, पीक साठवणुकीची सुविधा
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी 'न्यूट्रिशन अॅग्रीकल्चरल फंड ऑफ इंडिया' (बीपीकेके) सुरू केले. याच्या चांगल्या परिणामासाठी भारतातील १२८ कृषी- हवामान विभागामध्ये अनेक प्रकारच्या पिकांचे भांडार असेल.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले की, अन्नधान्याच्या बाबतीत देशाला सक्षम बनविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची कंपनी, शेतकरी व नागरी समाजातील सदस्यांसमवेत व्यासपीठावर आली असताना ही एक अनोखी घटना आहे. तसेच त्यांनी सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखंड हरितक्रांतीच्या संदेशास अनुरूप आहे ज्याद्वारे देशातील नागरिकांना अन्नाची गरज किंवा देशातील घेतल्या जाणाऱ्या पिकांची पद्धती आणि कृषी उत्पादनामध्ये सुसंवाद साधने शक्य होईल. त्यांनी असेही सांगितले आहे कि, सरकारने जल शक्ती नावाचे एक स्वतंत्र मंत्रालय तयार केले आहे, जे आता देशातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याचे काम करीत आहे._x000D_ संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १८ नोव्हेंबर २०१९_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
695
0