AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतात यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक मोटरसायकल!
सल्लागार लेखTV9 Marathi
भारतात यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक मोटरसायकल!
➡️ जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असलेली यामाहा भारतीय बाजारपेठेसाठी एक ईव्ही स्कूटर तयार करणार आहे. कंपनीने आपल्या या योजनेची नुकतीच माहिती शेअर केली होती. ताज्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात सरकारचे धोरण निश्चित झाल्यानंतरच कंपनी ही स्कूटर लॉन्च करण्याबाबत विचार करणार आहे. त्यानंतरच देशातील ईव्ही स्कूटरच्या रोडमॅपबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक बेसिक स्ट्रक्चर कशाप्रकारे सेट करण्याची योजना आखत आहे, याकडे सध्या यामाहा कंपनीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सरकारच्या योजनेमध्ये पुरेसे चार्जिंग स्टेशन, बॅटरी स्वॅपिंग हब तसेच इतर पर्यायांचा समावेश आहे. सरकारने या विविध सुविधांबाबत कोणती पावले उचललीत हे पाहून यामाहा ईव्ही स्कूटरच्या निर्मितीचे पुढील धोरण ठरवणार आहे. भारतीय बाजारपेठेसाठी नव्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची योजना ➡️ यामाहाच्या वतीने अलिकडेच खुलासा करण्यात आला होता की, कंपनी जपानच्या आपल्या मुख्यालयात ईव्हीएससाठी एक नवीन प्लॅटफॉर्म डेव्हलप करीत आहे. या नव्या प्लॅटफॉर्मचा भारतीय आणि जागतिक बाजारपेठांसाठी ईलेक्ट्रीक वाहने बनवण्याकरीता वापर केला जाणार आहे, असेही यामाहाने त्यावेळी स्पष्ट केले होते. कंपनीने आता ईलेक्ट्रीक वाहनांच्या लॉन्चिंगबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. भारत सरकारच्या धोरणाची प्रतिक्षा ➡️ ऑटोकार इंडियाच्या अहवालानुसार, यामाहा मोटर्स आपले ईलेक्ट्रीक दुचाकी लॉन्च करण्यापूर्वी भारत सरकारच्या धोरणाची प्रतिक्षा करीत आहे. सरकार इलेक्ट्रीक वाहनांसाठी एक स्थिर स्वरुपाचा रोडमॅप तयार करेल, अशी कंपनीला आशा आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
8
1
इतर लेख