AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात!
सल्लागार लेखTV9 Marathi
भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात!
➡️ भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात, एकदा चार्ज केल्यावर ८ तास काम करणार भारत सरकार येत्या १५ दिवसांत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे. ➡️ भारत सरकार येत्या १५ दिवसांत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच करणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे. अद्याप या ट्रॅक्टरच्या फीचर्सबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या ट्रॅक्टरमध्ये बॅटरीचा वापर केला जाणार असून हा ट्रॅक्टर इलेक्ट्रिक असेल. ➡️ दरम्यान, हा देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर नाही. कारण वाहन उत्पादक कंपनी सोनालिकाने यापूर्वीच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच केला आहे. कंपनीने गेल्या वर्षी ‘Tiger Electric’ नावाने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच केला आहे. हा ट्रॅक्टर युरोपात डिझाईन करण्यात आला आहे आणि पूर्णपणे भारतात तयार केला आहे. या ट्रॅक्टरचं प्रोडक्शन भारतात सुरु आहे. ➡️ Sonalika Tiger चे फीचर्स सोनालिका टायगर इलेक्ट्रिकमध्ये कंपनीने IP67 मानांकन असलेली २५.५ kW क्षमता असलेल्या नॅचुरल कुलिंग कॉम्पॅक्ट बॅटरीचा वापर केला आहे. या ट्रॅक्टरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो डिझेल ट्रॅक्टरच्या खर्चापेक्षा केवळ एक चतुर्थांश खर्च या ट्रॅक्टरवर होतो. त्यामुळे हा ट्रॅक्टर वापरणाऱ्याची खूप बचत होईल. कंपनीने म्हटलं आहे की, तुमच्या घरातील रेग्युलर सॉकेटद्वारे या ट्रॅक्टरची बँटरी चार्ज करता येईल. विशेष म्हणजे केवळ १० तासात या ट्रॅक्टरची बॅटरी पूर्ण चार्ज होईल. ➡️ दरम्यान, कंपनीने फास्ट चार्जिंग सिस्टिमही ऑफर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही अवघ्या ४ तासात या ट्रॅक्टरची बॅटरी फुल चार्ज करु शकता. हा ट्रॅक्टर २ टन वजनाच्या ट्रॉलीसोबत २४.९ किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकतो. एकादा फुल्ल चार्ज केल्यावर हा ट्रॅक्टर तब्बल ८ तास काम करतो. सोनालिका ट्रान्समिशनने सुसज्ज असल्याने हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूपच सोयीस्कर ठरू शकतो. कारण या ट्रॅक्टरमधून कोणत्याही प्रकारची उष्णता बाहेर पडत नाही. संदर्भ:- tv9marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
146
28