AgroStar
भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी!
सल्लागार लेखTV9 Marathi
भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी!
➡️ भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट कमाई मिळविण्याची संधी मिळू शकते. शेतकऱ्यांना यासाठी विशेष पद्धतीने भाताची लागवड करावी लागेल. या विशिष्ट प्रकारच्या शेतीला फिश-राईस फार्मिंग असे म्हणतात. या प्रकारच्या शेतीत भातसह मासे पालनही करता येते. यामुळे शेतकऱ्यांना धानासोबत मासे विक्रीतूनही फायदा होणार आहे. खास बाब म्हणजे भात शेतात मासे वाढवल्यास त्याचे उत्पादनही चांगले मिळेल. अशा प्रकारची शेती कुठे होते? ➡️ सध्या चीन, बांगलादेश, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड येथे या प्रकारे भात शेती केली जाते. भारतातील काही भागात फिश-राईस शेतीच्या सहाय्याने शेतकरी दुप्पट उत्पन्न कमावत आहेत. फिश राईस शेती कशी होते? ➡️ फिश राईस शेतीमध्ये भात पिकामध्ये साठलेल्या पाण्यातही मासे पालन केले जाते. अशा प्रकारे धान आणि मासे विक्रीतून दुप्पट उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. शेतकरी पहिल्यांदा भाताची लागण करण्यापूर्वी फिश कल्चर तयार करू शकतात. याशिवाय शेतकरी फिश कल्चर देखील खरेदी करू शकतात. या प्रकारे शेती केल्यास मस्त्यशेतीतून चांगला फायदा होऊ शकतो. माशाचे उत्पादन, भात लागवडीच्या पध्दती, माशांची प्रजाती आणि त्यावरील व्यवस्थापनावरदेखील अवलंबून असते. या प्रकारच्या शेतीत मासे आणि भात पीक एकाच शेतात घेतलं जातं. मासे शेतीचा साधारणत: याचा तांदळाच्या उत्पादनावरही विपरित परिणाम होत नाही. एकाच शेतात एकत्रितपणे मत्स्यपालन केल्याने भात रोपांची रोगांपासून मुक्तता मिळते. कोणती शेतजमीन गरजेची- ➡️ या प्रकारच्या शेतीसाठी कमी उतार असलेली जमीन निवडली जाते. या प्रकारच्या शेतात पाणी सहजतेने जमा होते. तसेच शेताची तयारी करण्यासाठी सेंद्रिय खतावर अवलंबून राहावे. साधारणपणे मध्यम पोत असलेली गाळाची माती उत्तम मानली जाते. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
7
इतर लेख