गुरु ज्ञानAgroStar
भात पिकामधील तुडतुडे प्रादुर्भाव आणि नियंत्रण!
🌱भात पिकामध्ये हिरवे आणि तपकिरी रंगाचे तुडतुडे आढळतात. तुडतुड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानातील रस शोषतात. परिणामी, पाने पिवळी पडून रोपांची वाढ खुंटते. हिरवे तुडतुडे भात पिकावर टुंग्रो या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते. तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव शेताच्या मध्य भागातून गोलाकार पट्ट्यामध्ये पिवळे
भाग दिसतात. पुढे त्याची वाढ होऊन शेत जळल्यासारखे दिसते. यालाच ‘हाॅपर बर्न’ असे म्हणतात. प्रतिबंधात्मक म्हणून नत्र खतांचा संतुलित वापर करावा. व फवारणीसाठी डिनोटेफुरान 20 % SG घटक असलेले डायनशिल्ड 60-80 ग्रॅम प्रति एकर वापरावे.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.