अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील फुलोरा ते दाणे भरणे अवस्थामध्ये घ्यावयाची काळजी!
➡️ भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा १७ किलो युरिया प्रति एकरी द्यावी. पावसाची उघडझाप, वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे माळ जमिनीवर असलेल्या हळव्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ➡️ या किडीच्या अळ्या दिवसा फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात. रात्री पाने व लोंब्या कुरतडून खातात. त्यांच्या नियंत्रणासाठी भात पिकात एकरी तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत. ➡️ सकाळी किंवा सायंकाळी भात पिकातअळीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरपायरीफॉस (१.५ टक्के भुकटी) ८ किलो प्रति एकरी सायंकाळी किंवा सकाळी वारा शांत असताना पर्यावरण व स्वसुरक्षेची काळजी घेऊन व्यवस्थित धुरळणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
3
इतर लेख