गुरु ज्ञानAgroStar
भात पिकातील खोड कीड नियंत्रण!
🌱सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे भात पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या किडीची अळी सुरवातीच्या काळात कोवळ्या पानांवर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करते. आतील भाग पोखरून खाते. परिणामी, फुटवा सुकण्यास
सुरुवात होते. तसेच रोपाचा गाभा मरतो. यालाच ‘डेट हर्ट’ किंवा ‘कीडग्रस्त फुटवा’ असे म्हणतात.
🌱रोगग्रस्त रोपाचा फुटवा ओढल्यास सहजासहजी निघून येतो. पीक तयार होण्याच्या वेळी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात. यावर उपाययोजना म्हणून फ्लुबेन्डियामाइड 19.92% + थियाक्लोप्रिड 19.92% SC घटक असणारे मॅगना कीटकनाशक @100 मिली याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.