AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकातील खोड किडीचे एकात्मिक नियंत्रण!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील खोड किडीचे एकात्मिक नियंत्रण!
• उष्ण व दमट हवामानात किडींचा अधिक प्रादुर्भाव जास्त होतो. • अळी सुरूवातीस काही वेळ कोवळया पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. • किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पिक पोटरीवर येण्यापुर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच “गाभा मर” असे म्हणतात. • सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतो. • पोटरीतील पिकावर देखील खोडकीडीचा उपद्रव आढळुन येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढ-या लोंब्रा बाहेर पडतात. यालाच पळींज किंवा पांढरी पीसे असे म्हणतात. परिणामत: भाताच्या उत्पादनात मोठया प्रमाणावर घट येते.  नियंत्रण:- • भात पिकाची जुलैच्या पहिल्या पंधरवड्या पर्यंत लागवड करावी. • शिफारशीनुसारच नत्र खतांची मात्रा द्यावी. • पिकामध्ये युरिया खताचा वापर करण्याऐवजी अमोनिअम सल्फेटचा वापर करावा. • पेरणीनंतर रोपवाटीकेमध्ये १५ दिवसांनी क्लोरेंट्रेनिलिप्रोल ०.४ जीआर किंवा कार्बोफुरॉन ३ टक्के किंवा कारटॅप हारड्रोक्लोराईड ४ जी किंवा फिप्रोनील ०.३ जीआर @१ किलो प्रति १०० चौ.मी क्षेत्रामध्ये वाळू सोबत फोकून द्यावे. • पुर्नलागवड करण्यापूर्वी रोपांचे शेंडे कापून लागवड करावी. • या किडींच्या प्रौढ पतंगांना आकर्षित करण्यासाठी गंध सापळ्यांचा देखील वापर करावा. • शक्य असल्यास पिकामध्ये प्रकाश सापळे स्थापित करावेत. • तसेच क्लोरेंट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा फ्लुबेंडायमाईड २० डब्ल्यूजी @२.५ ग्रॅम किंवा फिप्रोनील ८० डब्ल्यूजी @१ ग्रॅम किंवा फ्लुबेंडायमाईड ४% + बुप्रोफेंझीन २० ग्रॅम एससी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस., ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
46
27
इतर लेख