AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकातील करपा (ब्लास्ट) रोगाचे नियंत्रण!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील करपा (ब्लास्ट) रोगाचे नियंत्रण!
रोगाची लक्षणे- रोगाचा प्रादुर्भाव अगदी रोपावस्थेपासून ते पीक पक्वतेच्या काळात कोणत्याही अवस्थेत पान, खोड, पेये व लोंबीच्या मानेवर होतो. पानावर लंबगोलाकार म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमुळते होत जाणारे असंख्य ठिपके पडतात. ठिपक्यांच्या मध्य राखाडी रंगाचा व कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात. ठिपक्यांचा आकार आणि रंग यावरून हा रोग सहज ओळखता येतो. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने मोठ्या प्रमाणावर करपतात. पानांप्रमाणेच पेये आणि लोंबीच्या दांड्यावर सुद्धा रोग येतो, त्यामुळे रोगट ठिकाणी पेये आणि मन मोडून लोंबीत दाणे भरत नाहीत. यासाठी पिकामध्ये याचे सुरुवातीपासूनच नियंत्रण करणे आवश्यक आहे. उपाययोजना - पावसाची उघडीप पाहून कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी @२०० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल ५% एससी @२०० ते ४०० मिली किंवा कार्बेन्डाझिम १२% + मॅंकोझेब ६३% डब्ल्यूपी @३०० ग्रॅम प्रति एकर १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन-तीन फवारण्या कराव्यात. शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पिकाला नत्रयुक्त खतांची पुढील मात्रा कमी प्रमाणात द्यावी."
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
15
इतर लेख