गुरु ज्ञानAgrostar
भात पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची मशागत!
👉🏻कोरड्या जमिनीत एक चांगली खोलवर उभी आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत मिक्स करावे.
👉🏻नंतर 2 ते 3 वखरण्या करून कचरा व धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.
👉🏻जमिनीतील कणांतर्गत हवेचे चलनवलन मर्यादित राहण्यासाठी चांगल्या प्रतीची चिखलणी करावी.
👉🏻यासाठी उभी आडवी चिखलणी करून, फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागात समान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्वमशागत करावी.
👉🏻चिखलणी पावर टिलर अथवा पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीने करू शकता.
👉🏻चिखलणी मुळे शेतात पाणी साचून राहते आणि तनांचा नाश होतो.
👉🏻तसेच दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते.
👉🏻चिखलणी करताना जमिनीत खतांची मात्रा द्यावी.
👉🏻संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.