गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकाचे ‘या’ किडींमुळे अधिक नुकसान होते
देशातील बहुतेक भागात भात रोपेंची लागवड संपुष्टात आली आहे. हे चित्र पाहता, भात रोपांची काळजी घेणे आवश्यक आहे. आता, काही भागात फुलोरा अवस्था सुरू होणार आहे. या ठिकाणी अपुरी काळजी घेतल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या टप्प्यावर आक्रमण होणाऱ्या संभाव्य किडींचे आणि धान्यमधील किडीच्या व्यवस्थापनाचे विश्लेषण करूया. • खोड कीड: ही कीड खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे मुख्य पोंगा वाळून जातो. याचा परिणाम म्हणून पोटरीत दाणे न भरता पांढरे पडतात. त्याचबरोबर सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून जातो, यालाच 'पळींज' किंवा 'पांढरी पिसे' असे म्हणतात. • पाने गुंडाळणारी अळी: या किडीची अळी पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिकटवून गुंडाळी करते व त्यात राहून आतील पृष्ठभागातील हरितद्रव्ये खाते. त्यामुळे गुंडाळीच्या बाह्य पृष्ठभागावर पांढरट चट्टा दिसतो. • लीफ हॉपर्स (तपकिरी तुडतुडे): ही कीड सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वळतात व जळाल्यासारखी दिसतात. शेतीमध्ये ठिकठिकाणी तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताचे पीक दिसते, यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. यामुळे रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच, तर दाणे न भरता पोचट राहतात. • राईस स्किपर: ही अळी पानाच्या काठाला गुंडाळते आणि आतील भाग खाते, त्यामुळे पाने कापल्यासारखी दिसतात. • हॉर्न कॅटरपिलर: या अळीच्या डोक्याच्या भागावर दोन लाल शिंगे असतात. ते पानांच्या काठापासून खायला सुरूवात करते आणि पाने खात मध्य भागापर्यंत प्रादुर्भाव करते. • निळे भुंगेरे: या किडीचे प्रौढ आणि अळ्या पानाचा हिरवा भाग/ हरितद्रव्ये खातात व पापुद्रा तसाच ठेवतात, त्यामुळे पानांवर समांतर पांढऱ्या रेषा उमटतात. • राईस इअर हेड बग: ही कीड एक आक्षेपार्ह गंध सोडते आणि म्हणूनच "गुंडी बग" म्हणून ओळखली जाते. पिल्ले आणि प्रौढ दोघेही पीक पोटरीच्या अवस्थेत असताना, प्रादुर्भाव करतात त्यामुळे लोंबीमध्ये दाणे न भरता पोकळ राहते. • लष्करी अळी: या किडीचा रोपवाटिकेत प्रादुर्भाव झाल्यास, जमिनीलगत रोपे कापून खाल्ली जातात यामुळे अधिक नुकसान होते. ही कीड जमिनीलगत आढळून येते. • पर्णकोश कोळी: ही कीड पानांमधील रस शोषण करतात आणि त्यामुळे बुरशीचे पानात प्रादुर्भाव वेगाने वाढतो. परिणाम लोंबीमध्ये सर्व दाणे न भरता तपकिरी पडतात. • खेकडे : खेकडे जमिनीलगत रोपे कापून टाकतात तसेच जमिनीमध्ये छिद्रे तयार करून वास्तव्य करतात. या बिळातून शेतातील पाणी वाहून जाते. पिकाच्या वाढीस आवश्यक असणारे पाणी शेतात साचून राहत नाही, त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. • उंदीर: उंदीर परिपक्व असणारे पोंगे कुरतडून आपल्या बिळामध्ये साठवतात.
रासायनिक व्यवस्थापन: • बीपासून नुकतेच तयार झालेले रोपे पुर्नलागवडीपूर्वी क्लोरपायरिफॉस २० ईसी @०.०२% + युरिया @१% यांच्या मिश्रणात ४ तास बुडवा. • लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ग्रॅन्यूअल्स क्विनॉलफॉस १.० किलो / हेक्टरी द्यावे. • नव्याने उबविलेल्या अळीच्या नियंत्रणासाठी ७ दिवसांच्या अंतराने २ वेळा क्विनॉलफॉस किंवा फॉस्फोमिडॉन ०.५ किलो प्रति हेक्टरी द्यावे. • गुंडी बगच्या नियंत्रणासाठी मॅलेथिओनची धुरळणी करणे प्रभावी ठरते. • लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास, सायंकाळी नुवान ०.५ किलो प्रति हेक्टरी द्यावे. जैविक व्यवस्थापनः • भात पिकातील अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा जपोनिकम या परभक्षी कीटकांची ५०,००० अंडी प्रति हेक्टर प्रति आठवड्याच्या अंतराने सोडावी. • मिरेड बग (सायटोरिनस लिव्हिडिपेंनिसच) @५०-७५ अंडी प्रति चौरस मीटर सोडावे. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
378
5
संबंधित लेख