AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान

भात पिकाची रोपवाटिका आणि बीज प्रक्रिया पद्धत !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकाची रोपवाटिका आणि बीज प्रक्रिया पद्धत !
☑️भात पिकाची रोपवाटिकेसाठी गादीवाफा पद्धत : 🌱जमीन उभी आडवी नांगरणी नंतर कुळवणी करून भुसभुशीत करावी.धसकटे आणि काडीकचरा वेचून घ्यावा. रोपवाटिकेसाठी सुपीक व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.एक एकर लागवडीसाठी ४ गुंढे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. 🌱साधारण १ मीटर रुंदी आणि १५-२० सें.मी. उंचीचे आणि उतारानुसार योग्य लांबीचे गादीवाफे तयार करावेत. वाफ्यांना १ गुंठा क्षेत्रासाठी शेणखत त्याच बरोबर ५०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद आणि ५०० ग्रॅम पालाश किंवा ३ किलो ३०० ग्रॅम सुफला (१५:१५:१५ ) या रासायनिक खतांची मात्रा सुरुवातीला मातीत मिसळून द्यावी. 🌱बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर वाफ्यावर समांतर ओळीमध्ये ७ ते ८ सें.मी. अंतरावर आणि २ ते ३ सें.मी. खोलीवर बियाणे पेरून मातीने झाकून घ्यावे. 🌱पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी तणे असल्यास तण काढून एक गुंठा रोपवाटिका क्षेत्रास १ किलो युरिया खत द्यावे. वाणांच्या पक्वता कालावधीनुसार २१ ते २७ दिवसांच्या वयाची निरोगी रोपे निवडावी व लागवडीपूर्वी रोपे क्लोरोपायरीफॉस आणि बाविस्टीन च्या द्रावणात २ तास बुडवून ठेवावी ☑️बीज प्रक्रिया क्रम: 🌱पेरणीपूर्वी शेतकरी स्वतः तयार केलेले बियाणे वापरत असल्यास ३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. 🌱तरंगणारे पोचट, हलके, किंडकट, रोगट, इत्यादी बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे आणि सावलीत वाळवावे. त्यांनतर प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिम बुरशीनाशक चोळावे.त्यानंतर १५ मिनिटांनी अझाटोबँक्टर २५ ग्रॅम प्रति किलो बिजप्रक्रिया करावी. 🌱सर्वात शेवटी स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया करून बियाणे अर्धा तास सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
5
इतर लेख