AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पड क्षेत्रासाठी ‘या’ जिल्हयांना ७ कोटी अनुदान
कृषि वार्तापुढारी
भात पड क्षेत्रासाठी ‘या’ जिल्हयांना ७ कोटी अनुदान
पुणे – केद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत(एनएफएसएम) राज्यातील १७ जिल्हयांतील भात पड क्षेत्रामध्ये कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी ७ कोटी रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अभियानात शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक एन.टी.सिसोदे यांनी दिली. अभियानात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या १७ जिल्हयांचा समावेश आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
भात काढणीनंतर बहुतांशी शेतकऱ्यांकडून संबंधित शेती पड राहते. जमिनीतील ओलाव्याच्या फायदा घेऊन रब्बी हंगामातही कडधान्य उत्पादनात वाढ करण्याती चांगली संधी शेतकऱ्यांना आहे. याचा विचार करूनच केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या ही मोहीम आखली आहे. यामध्ये हरभरा, मूग, मसूर, वाल व लाखोळी आदि पिकांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत घेतली जाणारी प्रात्यक्षिके ही भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या किंवा कृषी विदयापीठाने शिफारस केल्यानुसार असावीत, तसेच वापरले जाणारे वाण १० वर्षाच्या आतील असावेत. प्रात्यक्षिकांचे शंभर टक्के जिओ टॅगिंग करून नियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संदर्भ – पुढारी, ३ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
8
0
इतर लेख