AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला पिकामध्ये रोपवाटिका नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
भाजीपाला पिकामध्ये रोपवाटिका नियोजन!
🌱भाजीपाला पिकांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार केल्यामुळे अनेक फायदे होतात. रोपांची रोपवाटिकेमध्ये स्वतंत्रपणे चांगली निगा ठेवता येते व जागेची व बियांची बचत होते आणि शेताची पूर्वमशागत करण्यास पुरेसा वेळ मिळतो. रोपवाटिका बनवताना प्रथम जमीन भुसभुशीत करून नंतर ३ मी. लांब, १ मी रुंद व १५ ते २० से. मी. उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. बियाण्याचे दर जास्त असल्याने बी टाकताना चांगली काळजी घ्यावी. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर दीड सें. मी. खोलीच्या हलक्या हाताने रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे व हळुवार मातीने झाकावे. बियांच्या पेरणीनंतर गादी वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. बियांची उगवण होईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0