AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला पिकामध्ये अधिक फळधारणा साठी योग्य व्यवस्थापन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला पिकामध्ये अधिक फळधारणा साठी योग्य व्यवस्थापन!
फळवर्गीय भाजीपाला पिकांच्या अपेक्षित उत्पादनासाठी लागवडीची योग्य वेळ, योग्य वाणाची निवड या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. योग्य प्रमाणात फळधारणेसाठी इतरही अनेक घटक कारणीभूत असतात. त्यांची माहिती घेऊन लागवडीचे नियोजन व उपाययोजना कराव्यात. सातत्याने होणारे हवामानातील बदल, पाणीटंचाई किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर, असंतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच पिकात मधमाशीच्या अभावामुळे परागीभवन न होणे आदी कारणांमुळेही फळधारणा कमी होते. फळधारणा न होण्याची कारणे 1. अयोग्य जातीची निवड 2. लागवडीचा अयोग्य कालावधी 3. समतोल अन्नद्रव्याचा अभाव 4. सिंचनाचे अयोग्य नियोजन 5. परपरागीकरण समस्या 6. नर व मादी फुलांचे गुणोत्तर 7. पीकसंजीवकांचा अभाव 8. योग्य अवस्थेमध्ये काढणी न करणे 9. अयोग्य कीड व रोग नियंत्रण उपाययोजना- • वातावरणातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पर्जन्यमान या घटकांचा फुलांच्या निर्मितीवर, परागीभवनावर, फळधारणेवर व वाढीवर परिणाम होत असतो. तसेच भाजीपाला पिकाच्या काही जातींची पक्वता लवकर होते. काहींची उशिरा होते. त्यामुळे हंगाम व कालावधीनुसार योग्य जातींची निवड करावी. • अन्नद्रव्यांची कमतरता तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास फुलांची निर्मिती, फळधारणा कमी होते. त्यासाठी मातीपरीक्षणानुसार आणि पिक वाढीच्या अवस्थेनुसार पिकास मुख्य व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करावा. • पीक अवस्थेनुसार योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास फायदेशीर • परपरागीकरण आवश्यक असलेल्या पिकात (वेलवर्गीय भाजीपाला) नर व मादी फुलांचे भाग एकत्र नसतात. त्यामुळे परपरागीकरणासाठी मधमाशा, फुलपाखरे मदत करतात. त्यामुळे भाजीपाला उत्पादन क्षेत्रात किंवा जवळपास मधमाशी पालन करावे. • पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर कीडनाशकांचा वापर टाळावा. ते शक्य नसल्यास मधमाशांना हानिकारक असलेली कीडनाशके वापरु नयेत किंवा जैविक कीडनाशकांचा वापर करावा • पीक २ व ४ पानांच्या अवस्थेत असताना अल्फा नॅपथ्यालीक ऍसिटिक ऍसिड यांसारख्या संजीवकांचा वापर फवारणी साठी केल्यास मादी फुलांची संख्या वाढते. • काही भाजीपाला पिकांमध्ये (उदा. वांगी) एकूण फुलोत्पादनापैकी बरीच फुले नैसर्गिक फळधारणा करण्यास अक्षम असतात. या समस्येवर उपाय म्हणून फुलधारणेस सुरवात झाल्यानंतर शिफारशीत वाढ रोधकाची फवारणी केल्यास फायदा होतो. • वेळीच योग्य पद्धतीने रोग व किडींचे नियंत्रण करावे व अन्नद्रव्ये पुरवठा करून फुल, फळगळ नियंत्रित करावी. • फळांची काढणी योग्य वेळी केल्यास नवीन फुलांच्या निर्मितीसाठी व उपलब्ध फुलांच्या योग्य वाढीसाठी मदत मिळते. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
64
7
इतर लेख