सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला पिकामध्ये अधिक फळधारणासाठी योग्य व्यवस्थापन
फळवर्गीय भाजीपाला पिकामध्ये खालील बाबींमुळे फळधारणा कमी होते. फळधारणा न होण्याची कारणे 1. अयोग्य जातीची निवड 2. लागवडीचा अयोग्य कालावधी 3. समतोल अन्नद्रव्याचा अभाव 4. सिंचनाचे अयोग्य नियोजन 5. परपरागीकरण समस्या 6. नर व मादी फुलांचे गुणोत्तर 7. पीकसंजीवकांचा अभाव 8. योग्य अवस्थेमध्ये काढणी न करणे 9. अयोग्य कीड व रोग नियंत्रण
उपाययोजना- _x000D_ • हंगाम व कालावधीनुसार योग्य जातींची निवड करावी._x000D_ • मातीपरीक्षणानुसार आणि पीक वाढीच्या अवस्थेनुसार पिकास मुख्य व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात वापर करावा._x000D_ • पीक अवस्थेनुसार योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास फायदेशीर._x000D_ • परपरागीकरणासाठी मधमाशा, फुलपाखरे मदत करतात त्यामुळे भाजीपाला उत्पादन क्षेत्रात किंवा जवळपास मधमाशी पालन करावे._x000D_ • पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर कीडनाशकांचा वापर टाळावा. शक्यतो, जैविक कीडनाशकांचा वापर करावा._x000D_ • पीक २ व ४ पानांच्या अवस्थेत असताना अल्फा नॅपथ्यालीक ऍसिटिक अ‍ॅसीड यांसारख्या संजीवकांचा वापर फवारणीसाठी केल्यास मादी फुलांची संख्या वाढते._x000D_ • भाजीपाला पिकांमध्ये फुलधारणेस सुरेवात झाल्यानंतर शिफारशीत वाढ रोधकाची फवारणी केल्यास फायदा होतो._x000D_ • वेळीच योग्य पद्धतीने रोग व किडींचे नियंत्रण करावे व अन्नद्रव्ये पुरवठा करून फुल, फळगळ नियंत्रित करावी._x000D_ • फळांची काढणी योग्य वेळी केल्यास नवीन फुलांच्या निर्मितीसाठी व उपलब्ध फुलांच्या योग्य वाढीसाठी मदत मिळते._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
530
0
इतर लेख