AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाग-१) टोमॅटोवरील तिरंगा समस्या
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाग-१) टोमॅटोवरील तिरंगा समस्या
टोमॅटोवरील तिरंगा फळाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये नियोजन करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये खालील समस्या उद्भवण्यापुर्वी प्रतिबंधात्मक काळजी घेणे आणि दुसरी बाब म्हणजे अशी समस्या आढळल्यावर काही तातडीचे उपाय करून समस्याची तीव्रता कमी करणे आवश्यक आहे. रोगाची लक्षणे- फळाचा बराचसा भाग पिवळा राहून संपूर्ण फळ पक्व होण्यास अपयशी ठरते. गैरसमज- तिरंगा फळ ही समस्या व्हरायटी/ वाण यामुळे असून याला विषाणूजन्य रोग जबाबदार आहेत.
कारणे- यावर अचूक असे कारण नमूद करणे काहीसे अशक्य असले, तरी पुढील काही कारणांचा परिणाम म्हणून ही समस्या उद्भवते._x005F_x000D_ १. टोमॅटो पीक लागवडीसाठी कमी गुणवत्तेची/ कमी कसदार जमीन निवड_x005F_x000D_ २. असंतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर_x005F_x000D_ ३. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव_x005F_x000D_ ४. विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव_x005F_x000D_ ५. अनियमित व कमी/जास्त प्रमाणात पाणी व्यवस्थापन_x005F_x000D_ ६. अति जास्त तापमानात योग्य ती काळजी न घेणे_x005F_x000D_ प्रथम टप्पा समस्या न येण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना:_x005F_x000D_ १. जमिनीची निवड- टोमॅटो पिकाची लागवड करताना कसदार, अन्नद्रव्यांनी समृद्ध व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. यासोबतच लागवड करण्याची पद्धत महत्वाची आहे. ज्यामध्ये मुळांना माती भुसभुशीत राहून, हवा खेळती राहण्यासाठी रुंद गाडी/बेड बनवून त्यावर ठिबकच्या आधाराने लागवड करावी. साधारण अर्धा फुट उंचीचा आणि ३ फुट रुंदीचा बेड असल्यास सफेद मुळीला चालना चांगली मिळून अन्नद्रव्य पुरवठा व्यवस्थित होतो._x005F_x000D_ २. संतुलित अन्नद्रव्ये वापर- टोमॅटो लागवड करण्यापूर्वी शक्य असल्यास माती परीक्षण करून अन्नद्रव्यांचा अंदाज घ्यावा. यासोबतच बेड बनविण्याच्या वेळीच त्यामध्ये खतांचा बेसल डोस भरावा (बेसल डोस मध्ये सेंद्रिय खत, निंबोळी पेंड, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांचा अंतर्भाव करावा) टोमॅटो लागवडीनंतर ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा नियमित वापर चालूच ठेवावा._x005F_x000D_ _x005F_x000D_ ३. हंगामनुसार योग्य वाणांची निवड- टोमॅटो जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने संकरित वाणची निवड करताना पुढील गोष्टीचा विचार करावा. उन्हाळ्यात येणारे वाण कधीही दिवस लहान आणि रात्र मोठी असताना येणार नाही, उचित उत्पादन देणार नाही म्हणून उन्हाळ्यात लागवड करताना सेमिनीज- अन्सल, आयुष्मान, सिंजेंटा- ६२४२, १०५७, बेयर- ११४३, बायोसीड वीर, जे के-८११ यांचा विचार करावा, तसेच खरिफ अथवा उशिरा खरीप हंगामासाठी सिंजेंटा- २०४८, सेमिनीज- गर्व, नामधारी ६२९ यापैकी वाणांचा विचार करावा. _x005F_x000D_ संदर्भ – तेजस कोल्हे (वरिष्ठ कृषी तंज्ञ) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
315
0
इतर लेख