AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
(भाग १) अश्वगंध लागवड व्यवस्थापन- औषधी वनस्पती
सल्लागार लेखअपनी खेती
(भाग १) अश्वगंध लागवड व्यवस्थापन- औषधी वनस्पती
अश्वगंध ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. कारण यामध्ये विविध औषधी गुणधर्म असल्यामुळे याला "अश्वगंध" असे म्हणतात. अश्वगंध वनस्पतीची बियाणे, मुळे आणि पाने यापासून अनेक औषधे तयार करण्यासाठी वापरले जातात. अश्वगंधापासून तयार केलेल्या औषधांचा वापर सिनील डिसफंक्शनचा त्रास कमी करण्यासाठी देखील होतो. जसे की, डोक्यावरचा ताण कमी करणे, चिंता, भिती आदि. अश्वगंधा वनस्पतीची सरासरी उंची ३० सें.मी.- १२० से.मी. असते. पांढरी तपकिरीमुळे असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीची फुले नारंगी-लाल सह हिरव्या रंगात आहेत. हे मुख्यत्वे: राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यासारख्या बऱ्याच भागात घेतले जाते. माती – मध्यम लाल मातीमध्ये अश्वगंधाचे चांगले उत्पादन मिळते. चांगली निचरा होणारी जमीन तसेच मातीचा सामू ७.५ ते ८.० असणे आवश्यक आहे. जमीन मशागत – जमिनीची नांगरट केल्यानंतर जमिनीची कोळपणी करून, पावसाच्या आधी शेतीमध्ये शेणखत मिसळून घ्यावे. एप्रिल- मे महिन्यात जमिनीची मशागत करून ठेवावी.
पेरणी- जुन – जुलैमध्ये अश्वगंधाची लागवड केली जाते. अंतर – लागवड करताना दोन ओळीमधील २०-२५ सेमी अंतर असावे. त्याचबरोबर दोन रोपमधील अंतर हे १० सेमी असावे तसेच लागवड बियाणेदेखील २ ते ३ सेमी खोल पेरावे. बियाणांचे प्रमाण – प्रति एकर ४-५ किलो बीजप्रक्रिया – बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी, पेरणीपूर्वी थायरम @३ ग्रॅम प्रति किलो बियाणांमध्ये मिसळून मग पेरणी करावी. संदर्भ – अपनी खेती जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
436
0
इतर लेख