क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअपनी खेती
(भाग-२) अश्वगंधा लागवड व तंत्रज्ञान (औषधी वनस्पती )
• रोपवाटिकेची व्यवस्थापन व लागवड- जमीन लागवडीपूर्वी नांगरणी व कोळपणी करून त्यामध्ये शेणखत मिसळून रोपवाटिकेसाठी गादीवाफे तयार करावे. बियाणांच्या पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. • खत व्यवस्थापन – जवळपास अंदाजे ८-१० टन शेणखत जमिनीच्या मशागतीच्या वेळी शेतीमध्ये मिसळून घ्यावे. औषधी वनस्पतीच्या वाढीसाठी जैविक खतांचा व कीटकनाशकचा वापर करावा. जैविक खतामध्ये गांडूळ खत, हिरवळी खत, काही जैविक कीटकनाशक निमतेल, गोमुत्र यासारख्या कीटकनाशकचा वापर करावा. यामुळे मातीतील बुरशीजन्य रोगांना आळा बसतो. त्याचबरोबर मातीची सुपीकता वाढविण्यासाठी नत्र १४ किलो, स्फुरद ६ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ३८ किलो प्रति एकर आवश्यकता असते. • तणव्यवस्थापन- जवळपास दोन खुरपणी होणे गरजेची असते. लागवडीनंतर २०-२५ नंतर खुरपणी करावी तसेच तणनियंत्रणासाठी लागवडीपूर्वी २० ते २५ दिवस अगोदर ग्लायफोसेट ६०० मिली प्रति एकर फवारणी करावी. • सिंचन व्यवस्थापन – या औषधी पिकांसाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही.पाऊस झाल्यास या वनस्पतीसाठी पाण्याची आवश्यकता लागत नाही. जर पाऊस न झाल्यास या वनस्पतीला २-३ पाण्याची आवश्यकता असते. • काढणी – पिकाची काढणी ही १६०-१८० दिवसांनी केली जाते. या पिकाची पाने हळू हळू सुकतात व त्यांचा बेरी हे लाल ऑरेंज रंगात बदलतात. संदर्भ – अपनी खेती
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
332
0
संबंधित लेख