AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भन्नाट ऑफर! लाखों रुपये कमविण्याची संधी!
कृषी वार्तालोकमत न्युज१८
भन्नाट ऑफर! लाखों रुपये कमविण्याची संधी!
10 दिवसात पैसे दुप्पट जिंव्हा महिनाभरात पैसे तिप्पट असे फसवे प्लॅन्स तुमच्या कानावर नेहमीच पडत असतील. आम्ही आज तुम्हाला एलआयसीच्या एका खऱ्याखुऱ्या आणि तुम्हाला लाभदायी असलेल्या प्लॅनबद्दल माहिती सांगतोय. हा असा प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज 200 रुपयांची गुंतवणूक करून 20 वर्षानंतर 28 लाख रुपये कमवू शकता. एवढंच नव्हे तर या पॉलिसीमध्ये 15,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन देखील दिली जाते. या प्‍लॅनचे नाव आहे जीवन प्रगती स्कीम. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनबद्दल. पॉलिसीची वैशिष्ट्यं 👉 पॉलिसीमध्ये दर पाच वर्षांनी रिस्क कव्हर वाढते. सुरुवातीचे पाच वर्ष सम अश्योर्ड तेवढेच राहते. यानंतर सहाव्या वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंत ही रक्कम 25% टक्क्यांहून 125% होते. त्याचप्रमाणे 11 व्या वर्षापासून 15 व्या वर्षापर्यंत सम इंश्योर्ड 150% होते. तर, 16 व्या वर्षापासून ते 20 व्या वर्षापर्यंत सम इंश्योर्ड बेसिक सम इंश्योर्डचा 200 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. 👉 म्हणजेच तुम्ही 2 लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर पहिल्यात पाच वर्षात डेथ बेनिफिटसाठी 2 लाख कव्हरेज, 6 ते 10 वर्षांसाठी 2.50 लाख कव्हरेज, 11 ते 15 वर्षांसाठी कव्हरेज 3 लाख आणि 16 ते 20 वर्षांसाठी 4 लाख रुपये कव्हरेज मिळेल. म्हणजेच मूळ रक्कम दुप्पट होते. शिवाय याच्या माध्यमातून अपघाती मृत्यु आणि अपंगत्वाचा राइडर उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागेल. प्रीमियमबद्दल माहिती 👉 या प्लॅनच्या माध्यमातून 15 लाख रुपयांची सम अश्योर्ड आणि 200 रुपये गुंतवणूक करून 20 वर्षांनी तुम्हाला 28 लाख रुपये मिळतील. ही रक्कम थोडीफार कमी जास्त होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने 30 वर्ष वयात एलआयसी जीवन प्रगती प्लॅनमध्ये प्रीमियम भरणं सुरू केल्यास वर्षाला जवळपास 73,898 रुपयांचा प्रीमियम द्यावा लागेल. म्हणजेच एका दिवसाचे 202 रुपये भरावे लागतील. 50 वर्षात तुम्ही जो प्रीमियम भरलाय ती रक्कम, लॉयल्टी बोनस आणि अॅडिशनल बोनस मिळून 28 लाख रुपयांपर्यंत होते. पॉलिसीसाठी पात्रता - किमान वय - 12 - कमाल वय - 45 - मॅक्झिमम मॅच्योरिटी उम्र - 65 - प्रीमियम पे मोड: वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक - ग्रेस पीरियड 15 ते 30 दिवस - पॉलिसी टर्म: 12 ते 20 वर्ष - मिनिमम सम अश्योर्ड: 1,50,000 - मॅक्झिमम सम अश्योर्डला कोणतीच मर्यादा नाही - लोन सुविधा: तीन वर्षांनंतर - तसंच पॉलिसी तीन वर्षांनंतर सरेंडर करता येते. - पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत उर्वरित प्रीमियम भरून रिव्हाईव्ह करू शकता. तुम्ही देखील एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या पॉलिसीमध्ये दीर्घ काळ गुंतवणूक करून चांगली रक्कम मिळवू शकता. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
4
इतर लेख