समाचारTV9 Marathi
बेटी धनाची पेटी! जबरदस्त योजना!
➡️ जर तुमच्या घरात नुकताच मुलीचा जन्म झालेला असेल किंवा भावा, बहीणीला मुलगी झालेली असेल तर तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारची एक जबरदस्त स्कीम आहे. मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. ती १८ वर्षांची झाल्यावर तिला ६५ लाख रुपयांपर्यंतचा फायदा तुम्ही मिळवून देऊ शकता.
➡️ जर तुमच्या घरात १० वर्षांपेक्षा लहान वयाची मुलगी असेल तर दर महिन्याला तिच्या नावे थोडी थोडी रक्कम बाजुला काढून वर्षाला एकत्रित पैसे भरून तिचे भविष्य सुखकर करू शकता. सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही पैसे गुंतवून मुलगी मोठी झाल्यावर तिला हे पैसे मिळू शकतील. हा पैसा तिचे लग्न किंवा शिक्षण यासाठी वापरता येईल.
➡️ सुकन्या समृद्धी योजनेत आपल्याला ७.६ टक्क्यांचं व्याज मिळतं. हे व्याज दर चार महिन्यांनी रिवाईज केलं जातं.आयकर अधिनियमच्या कलम ३७० सी अंतर्गत तुम्हाला दीड लाखआंपर्यंत गुंतवणूकीवर सूट मिळते.
➡️ ही योजना पोस्टाकडून सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून तुम्ही २५० रुपयांत खाते सुरु करू शकता. तसेच वर्षाला १५ लाखांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता.
➡️ एका मुलीच्या नावे एक आणि एक पालक दोन मुलीचे खाते उघडू शकतो. जर मुली तिळ्या किंवा जुळ्या असतील तर तिसऱ्या मुलीलाही याचा लाभ मिळेल. १० वर्षांपर्यंत हे खाते उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजना २१ वर्षांनी मॅच्युअर होते. परंतू या योजनेत 15 वर्षेच पैसे भरायचे असतात. मुलगी २१ वर्षांची झाली की तिला हे पैसे मिळतात.
➡️ या योजनेत पैसे गुंतविले की, जमा रक्कम, व्याजावरील कर माफ केला जातो. मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त असते. आयकर नियमानुसार तुम्हाला वर्षाला १.५ लाख रुपयांच्या रकमेवर करमाफी मिळते. त्यात ही रक्कम पकडली जाते.
कागदपत्रे.
➡️ सुकन्या समृद्धी योजनेनुसार खाते उघडण्यासाठी अर्ज करताना पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मुलीचे जन्म प्रमाणपत्र द्यावे लागेल. याशिवाय आई-वडिलांचे पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन पैकी एक ओळखपत्र द्यावे लागेल. याशिवाय पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-TV9Marathi,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.