AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बीज उत्पादन कांद्यासाठी मधमाशीचे महत्व!
गुरु ज्ञानAgrostar
बीज उत्पादन कांद्यासाठी मधमाशीचे महत्व!
🐝कांदा हे खरिफ आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये घेतले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. पण या पिकाची बियाणे निर्मिती फक्त एकाच हंगामध्ये म्हणजे रब्बीमध्ये होते. कांदा हे पर-परागीभवन होणारे पीक आहे. बीजोत्पादन कांदा पिकामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीने परागीभवन होणे अत्यंत महत्वाची बाब आहे आणि यासाठी मधमाशी उत्तम कार्य करते. पण यामध्ये येणाऱ्या समस्या आणि उपपययोजना खालीलप्रमाणे - 🐝समस्या: 👉🏼 कांदा पिकाला येणारी फुले ही सफेद रंगाची असल्यामुळे मधमाशी त्याच्याकडे लवकर आकर्षित होत नाही. फुलोरा अवस्थेमध्ये जर अतिशय लख्ख सूर्यप्रकाश असेल तसेच सकाळच्या किंवा दुपारच्या वेळी शेतामध्ये फवारणी चालू असेल तरीही त्याचा परिणाम मधमाशी वरती होतो. 👉🏼 मधमाशीने फुलोरा अवस्थेमध्ये आपल्या प्लॉट ला भेटच दिली नाही तर त्याचा परिणाम बियाण्याच्या गुणवत्तेवरती होतो.👉🏼परिणामी फुलामध्ये बियाणे तयार होत नाही किंवा बियाणे तयार झाले तर त्याची उगवण होत नाही. याचा परिणाम एकंदरीत उत्पादनावर होतो. 👉🏼ढगाळ वातावरणामध्ये देखील मधमाशीचे कार्य करण्याची क्षमता मंदावते आणि याचा परिणाम बियाण्याच्या गुणवत्तेवरती होतो. 🐝उपाययोजना: 👉🏼 मधमाशी आकर्षित करण्यासाठी शेतामध्ये किंवा शेताच्या कडेने कांदा लागवडी वेळीच रंगीबेरंगी फुलझाडे किंवा सुगंधी झाडे लावावी. उदाहरणार्थ - झेंडू, मोहरी, शेवंती, ऍस्टर, सूर्यफूल, कोथिंबीर, मेथी, पालक. 👉🏼 लागवडीपासून 45 दिवसांनंतर दिवसा फवारणी करणे टाळावे. जर फवारणी करायचीच असेल तर संध्याकाळी उशिरा फवारणी करावी. 👉🏼 उग्र वास असलेली कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांची फवारणी करणे देखील टाळावे. 👉🏼 याप्रकारे सर्व नियोजन केल्यास गुणवत्तापूर्ण बियाणे मिळून उत्पादन वाढीसाठी नक्कीच फायदा होईल. 👉🏼 यासोबतच दर्जेदार बीज उत्पादनासाठी वेळच्या वेळी कॅल्शियम, बोरॉन, पालाश, स्फुरद इत्यादी अन्नद्रव्यांची पूर्तता शक्य तो ठिबक अथवा आळवणीच्या माध्यमातून करावी. 🐝संदर्भ:Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
7
इतर लेख