AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बियाणे साठवणुकीत एकात्मिक कीड व रोगनियंत्रण
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बियाणे साठवणुकीत एकात्मिक कीड व रोगनियंत्रण
१) बियाणे साठवण ठिकाणे साफ ठेवावीत. २) पावसाचे पाणी साठवणीच्या ठिकाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. ३) बियाणामधील आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्के ठेवावे. ४) पोती साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी, जेणेकरून जमिनीशी संपर्क येणार नाही. ५) बाजारामध्ये आता साठवणुकीत ठेवण्यासाठी कीडनियंत्रक सापळे उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. ६) हवाबंद जागेमध्ये बियाणे साठवणूक केल्यास त्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कीड लागत नाही. ७) कडुलिंबाचा पाला साठवण पत्रामध्ये मिसळून ठेवला तरी चांगल्या प्रकारे कीडनियंत्रण होऊ शकते.
८) निमतेल, निमार्क यापैकी कोणतेही एक औषध 2 मि.ली. 1 किलो बियाणास चोळावे ९) साठवणुकीची पोती, कणग्या, पक्की कोठारे, वाहतुकीची साधने आणि भिंतींच्या फटीमधील किडींचा नाश करण्यासाठी मेलॉथियान 1 लिटर +100 लिटर पाणी यांची फवारणी करावी. ही फवारणी उघड्या बियाणावर करू नये. त्यानंतर बियाणाची साठवणूक करावी. १0) पावसाळ्यात औषधाची धुराळणी करून कीडींपासून तसेच बुरशीपासून बियाणांचे संरक्षण करता येते. त्यासाठी साठवणुकीचे ठिकाणे हवाबंद करावी. अॅग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
157
0
इतर लेख